Youth Drowning Death: परभणी जिल्ह्यातील धार येथे शुक्रवार २२ मे २.३० वाजत मित्रासोबत पोहण्यास गेलेल्या १६ वर्षाच्या तरुण सुमित भास्कर चोपडे विहिरीत बुडून मृत्यूने मृत दिसला.
धार शिवारातील घटना; ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद....!
परभणी (Youth Drowning Death) : मित्रासोबत विहिरीवर पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली. ही घटना तालुक्यातील धार येथे घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Youth Drowning Death) याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील धार येथील तरुण सुमित भास्कर चोपडे वय १६ वर्ष हा शुक्रवार २२ मे रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मित्रासोबत धार शिवारातील भरत कदम यांच्या शेतातील विहिरीवर पोहायला गेला होता. त्याने विहिरीत उडी मारली, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो बाहेर आलाच नाही. खाली गाळात रुतून बसला. त्यामुळे मोटार लावून पाणी उपसा करण्यात आला.
दुसर्या दिवशी शनिवार २३ मे रोजी सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेह तळाला दिसून आला. याबाबत अत्युत विश्वनाथ चोपडे यांनी परभणी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सपोनि. राजगुरु, सपोनि. आडके, सपोउपनि. कनाके आदींनी भेट दिली. या (Youth Drowning Death) प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोह हाके हे करीत आहेत.