Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

हॉटेलला आग- वीस हजारांचे नुकसान

धानोरा येथील नगरपंचायत समोर असलेले देविदास मांदाळे यांच्या चहा व नाश्त्याच्या हॉटेलला १८ मार्च रोजी पहाटे चार वाजता आग लागून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे.


हॉटेलला आग- वीस हजारांचे नुकसान

Tea Stall Fire |

धानोरा (Tea Stall Fire) : येथील नगरपंचायत समोर असलेले देविदास मांदाळे यांच्या चहा व नाश्त्याच्या हॉटेलला १८ मार्च रोजी पहाटे चार वाजता आग लागून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

येथील देविदास मांदाळे हे नगरपंचायत समोर चहा व नाश्त्याचे मागील दोन वर्षापासून हॉटेल लावून आपला उदरनिर्वाह करीत आहोत. त्यांची पत्नी व ते दोघे हॉटेल चालवतात. नेहमीप्रमाणे त्यांनी दिवसभर धंदा करून सायंकाळी हॉटेल बंद करून आपल्या घरी गेले. दरम्यान रात्रीच्या सुमारास अचानक हॉटेलला आग लागली. सकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी हॉटेल मालकाला घटनेची माहिती दिली. मांदाळे घटनास्थळी येईपर्यंत हॉटेलमध्ये असलेले सर्व वस्तू जळून राख झाले होते. त्यांनी कशीतरी आग विझवली. परंतु हॉटेलमध्ये असलेले पाच फायबर टेबल, एक लाकडी रॅक, १० फायबर खुर्च्या,  एक पाणी ड्रम ,पाण्याचे दोन कॅन, दोन घमेले तसेच इतर साहित्य जळून राख झाले होते. यामध्ये त्यांचे अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही.

Related to this topic: