Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ

उमरखेडमध्ये तलवार बाळगणार्‍या इसमावर गुन्हा

शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात तलवार बाळगून फिरणार्‍या एका इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.


उमरखेडमध्ये तलवार बाळगणार्‍या इसमावर गुन्हा

Sword Seizure |

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

उमरखेड (Sword Seizure) : शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात तलवार बाळगून फिरणार्‍या एका इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा गजानन सावळे (वय २६, रा. शिक्षक कॉलनी, उमरखेड) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

३० मार्च २०२६ रोजी दुपारी पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना मुखबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रित कॅफेच्या मागील बाजूस संशयित इसम थांबलेला असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पिवळ्या प्लास्टिक पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे २००० रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार आढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम ४, २५ अंतर्गत उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात शरद लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related to this topic: