International Yoga Day: आंतरराष्ट्रीय योग दिवसाविषयी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांख्यिक्यावर उत्साहान्वित सहभाग घेतला. योगासाठी महत्वाचे महत्त्व, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व
सामूहिक योगाभ्यासातून निरोगी भारताचा संकल्प
रिसोड (International Yoga Day) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. "एक पृथ्वी, एक आरोग्य आणि एक भविष्य" या यंदाच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामूहिक योगाभ्यासातून निरोगी भारत घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करणे, शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व योग दिनाच्या महत्त्वाविषयी मार्गदर्शनाने करण्यात आली.
यावेळी शिक्षकांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य जपण्यात योगाची असलेली भूमिका आणि तणावमुक्त जीवनासाठी योगाचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. योग (International Yoga Day) ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, पद्मासन आदी विविध योगासने तसेच प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक सादर केले. योग प्रशिक्षक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्त आणि सहभाग यामुळे संपूर्ण शाळा परिसर योगमय वातावरणाने भारावून गेला होता.
यावेळी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन एकाग्र होते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे प्रतिपादन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. "निरोगी शरीर, शांत मन आणि सशक्त समाज घडविण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे," हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.