Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल

'विचारांना अभिवादन, शिक्षणाचा उत्सव'

Manik Podar Learn School: स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिक्षणप्रेमी स्व. माणिकरावजी जाधव यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच शाळेचा ८वा वर्धापन


विचारांना अभिवादन शिक्षणाचा उत्सव

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे जयंती सोहळा व ८वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

रिसोड (Manik Podar Learn School) : स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिक्षणप्रेमी स्व. माणिकरावजी जाधव यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच शाळेचा ८वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव, सीमा मापारी, प्राचार्य हर्षल वासेवाल, मुख्याध्यापिका नर्गिस अंजुम, पवन जाधव, अनुप सपकाळ यांच्यासह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वसंतरावजी नाईक व माणिकरावजी जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी वक्त्यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना ग्रामीण विकास, शेती, सिंचन, शिक्षण आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच (Manik Podar Learn School) स्व. माणिकरावजी जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

याच प्रसंगी (Manik Podar Learn School) शाळेचा ८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन व सरस्वतीमातेच्या तसेच स्व. माणिकरावजी जाधव यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीची माहिती देण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त (Manik Podar Learn School) शिक्षक विजय खरबळ, सुनील जोशी आणि अभय औंढेकर यांची प्रेरणादायी भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, नृत्य, भाषणे, नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालक व नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. नवचैतन्य, प्रेरणा आणि संस्कारांचा संदेश देणारा हा जयंती सोहळा व वर्धापन दिन कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी केले.

Related to this topic: