जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्हा बँकेला ८०० कोटींचे अतिरिक्त कर्ज मंजूर
जळगाव (Jalgaon Loan Waiver) : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभदेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जळगावसह बाधित क्षेत्रातील कर्जवसुलीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
ना. पाटील यांनी स्पष्ट केले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीला गती मिळत आहे. येत्या ३१ मार्च पर्यंत सुमारे ५०० कोटी रुपयांची वसुली होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे. बँकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पतपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जळगाव जिल्हा बँकेसाठी ८०० कोटी रुपयांचे अतिरिक्त अल्पमुदत कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
कर्ज पुनर्गठनाबाबत बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, यासाठी संबंधित (Jalgaon Loan Waiver) शेतकऱ्यांची संमती अनिवार्य आहे. निर्धारित मुदत संपल्यानंतर पुनर्गठन करणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने, पात्र शेतकऱ्यांनी वेळेत आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असेआवाहनही त्यांनी केले आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजासाठी हा निर्णय संजीवनी ठरणार असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता आहे.
|
पुढील हंगामासाठी पुरेसा निधी
शासनाने खरीप आणि रब्बी हंगामासाठी एकूण १४०३.८६ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे (Jalgaon Loan Waiver) उद्दिष्ट ठेवले होते, त्यापैकी मोठ्या प्रमाणात वितरण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, आगामी खरीप हंगामासाठीही १२०० ते १३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, अशी ग्वाही सरकारतर्फ देण्यात आली आहे.
|