Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

Superstition

पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेचा अघोरी विधी; अल्पवयीन मुलीचा गैरवापराचा प्रयत्न, १५ जणांवर गुन्हा

पैशांचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित अमानुष व अघोरी विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे.


पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेचा अघोरी विधी अल्पवयीन मुलीचा गैरवापराचा प्रयत्न १५ जणांवर गुन्हा

उदगीर ग्रामीण पोलिसांची कारवाई; महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील आरोपींचा समावेश

लातूर : पैशांचा पाऊस पाडता येतो, या अंधश्रद्धेतून लक्ष्मीपूजेच्या नावाखाली कथित अमानुष व अघोरी विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उदगीर ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या विधीसाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार रविवारी (दि. १६) पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ठिकाण उदगीरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. आरोपींनी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा कथित विधी आयोजित केला होता. त्यासाठी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५७७/२०२६ नुसार महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ मधील कलम ३(३), तसेच पोक्सो कायद्यातील कलम १२ सह कलम १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये कुंडलीक देवराव रूपनर (वय 46, रा. तितरवणी, ता. शिरूर कासार, जि. बीड), सचिन साहेबराव भोंगळे (वय 35, रा. धानोरा वैद्य, ता. मूर्तीजापूर, जि. अकोला), अनिकेत सुभाष राठोड (वय 27, रा. वडी, ता. जिंतूर, जि. परभणी), समीर टिनघरे (रा. पुणे), लक्ष्मण विठ्ठल करंजी (वय 33, रा. बी. एच. लिंगमपल्ली, ता. आरसिपुरम, जि. संगारेड्डी, तेलंगणा), सनेश सुकुमार पनिके (वय 45, रा. लिंगमपल्ली, आरसीपुरम, जि. संगारेड्डी), दुर्गाप्रसाद मल्लेश ईरकला (वय 20, रा. बी. एच. ई. एल. लिंगमपल्ली, ता. आरसिपुरम, जि. संगारेड्डी, तेलंगणा), श्रीनिवास विरख्या चिलमुला (वय 45, रा. बी. एच. ई. एल. आरसीपुरम, जि. संगारेड्डी, तेलंगणा), बालाजी रघुनाथराव बिरादार (वय 25, रा. मुबारकपूर, ता. नारायण खेड, जि. संगारेड्डी, तेलंगणा), चंद्रया सुंदरराव कारम (वय 41, व्यवसाय मजुरी, रा. भिमावरम, ता. भिमावरम, जि. पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश), अनंतराव गंगाराम खुनिकार (वय 48, रा. निय्यापूर, ता. शेरलिंगमपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा), राजेश मोगली ईपन्नापल्ली (वय 42, रा. दिलसुख नगर, हैद्राबाद), सुनील कल्याण डेंगले (वय 52, रा. हडपसर, पुणे), राजू सेवू पवार (वय 48, रा. विजयपूर, कर्नाटक) आणि बालाजी (पूर्ण नाव व पत्ता नमूद नाही) यांचा समावेश आहे.

या प्रकरणात अल्पवयीन मुलीशी संबंधित गंभीर स्वरूपाचा प्रकार असल्याने पोलिसांनी पोक्सो कायद्यातील कलमांचाही समावेश केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली प्रतिबंधित आणि अमानुष विधी करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत.

गुन्हा दाखल करण्यासाठी लागला दिवस?

रविवारी (दि. १६) पहाटे सुमारे २ वाजता पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. आरोपींनी संगनमताने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेचा विधी आयोजित केल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. एखाद्या टोळीला रंगेहात पकडल्याचा दावा असतानाही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी दिवसभराचा कालावधी का लागला, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Related to this topic: