Deputy CM Sunetra Pawar: हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा केली.
हिंगोली (Deputy CM Sunetra Pawar) : हिंगोली, कळमनुरी, वसमत व सेनगाव येथील नगरसेवक तसेच जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती व संचालक यांनी 31 मार्च रोजी मुंबई येथील देवगिरी निवास येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार (Deputy CM Sunetra Pawar) यांची सदिच्छा भेट घेतली.
ही भेट आमदार राजुभैया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकासकामांना गती देणे तसेच पक्ष संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर उपमुख्यमंत्री सुमित्रा ताई पवार (Deputy CM Sunetra Pawar) यांच्याशी सकारात्मक व फलदायी संवाद साधण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक त्या बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, वसमत नगराध्यक्ष सुनिता बाहेती, सभापती विनोद अंभोरे, रत्नाकर अडसिरे निहाल भैया, आमेर अली, अमित कळासरे, सुखदेव बलखंडे मुजिब कुरेशी, अब्दुला पठाण, आयुब पठान आवेश पठान खयुम भाई, बासिद मौलाना, राजू देशमुख, उमेश देशमुख, इम्रान अली, सचिन दगडू, हबीब भाई, संदीप देशमुख, नंदाताई कुलते, सत्तार भाई, संदीप बहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.