Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

महाराष्ट्रातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू

महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी शनिवार, २ मे २०२६ पासून जाहीर करण्यात आली आहे.


महाराष्ट्रातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू

Summer Vacation 2026 |

विदर्भात १५ ते २९ जून सकाळी शाळा; ३० जूनपासून नियमित वेळापत्रक लागू

गडचिरोली (Summer Vacation 2026) : महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी शनिवार, २ मे २०२६ पासून जाहीर करण्यात आली आहे. शाळांच्या सुट्टीच्या कालावधीत एकसमानता व सुसंगती राखण्यासाठी शासनाने हे निर्देश जारी केले आहेत.

इतर मंडळांच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास, संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुट्टीबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात राज्यातील सर्व विभागांमध्ये सोमवार, १५ जून २०२६ पासून करण्यात येणार आहे. विदर्भातील उष्णतेचा विचार करून तेथील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७.०० ते ११.४५ या वेळेत चालविण्यात येतील. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी या सूचना सर्व मान्यताप्राप्त शाळांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.

Related to this topic: