Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

Suicide Case

वडिलांच्या अपघाती निधनानंतर नैराश्यात असलेल्या वकिलाची आत्महत्या; परभणीत खळबळ

वडिलांच्या अपघाती निधनानंतर नैराश्यात असलेल्या एका वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणी शहरातील गजानन नगर परिसरात घडली.


वडिलांच्या अपघाती निधनानंतर नैराश्यात असलेल्या वकिलाची आत्महत्या परभणीत खळबळ

Suicide Case |

परभणी : वडिलांच्या अपघाती निधनानंतर नैराश्यात असलेल्या एका वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणी शहरातील गजानन नगर परिसरात घडली. गुरुवार (२५ जून) रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी बळीराम सटवाजी पतंगे यांनी खबर दिली आहे. देवराज नागोराव अन्नपुर्वे असे मृत वकिलाचे नाव आहे.

माहितीनुसार, खबर देणारे बळीराम पतंगे यांचे साडू असलेल्या देवराज अन्नपुर्वे यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी अपघातात निधन झाले होते. या घटनेनंतर ते नैराश्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरातील हॉलमध्ये दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार सचिन बुरसुडकर करीत आहेत.

Related to this topic: