Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

तडाखेबाज उन्हात रसवंतीचा थंडावा

गेल्या आठवड्यात ४० अंश उंबरठ्यावर सेल्सियसच्या पोहोचलेल्या तापमानाने नागपूरकरांना अक्षरशः हैराण करून सोडले होते.


तडाखेबाज उन्हात रसवंतीचा थंडावा

Sugarcane Juice |

शहराचे तापमान ३४ अंशांवर

नागपूर (Sugarcane Juice) : गेल्या आठवड्यात ४० अंश उंबरठ्यावर सेल्सियसच्या पोहोचलेल्या तापमानाने नागपूरकरांना अक्षरशः हैराण करून सोडले होते. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेतून जात असताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा. लागला. सध्या तापमान ३४ अंशांवर आल्याने काहीसा दिलासा मिळाला. असला, तरी हा आराम फार काळ टिकणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता असल्याने उकाड्याचा तडाखा आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

नैसर्गिक पेयाला वाढती पसंती

उन्हाच्या या चढ-उतारामुळे शहरातील जनजीवनावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. सकाळपासूनच जाणवणारी उष्णता आणि दुपारच्या सुमारास वाढणारा कडक उकाडा यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे जिकिरीचे होत आहे. रस्त्यांवर वर्दळ कमी होत असताना, जे बाहेर पडतात ते थंडावा शोधत थेट शीतपेयांच्या स्टॉलकडे वळताना दिसतात. नागपूरमध्ये सध्या नैसर्गिक शीतपेयांचा ट्रेंड जोरात वाढताना दिसत आहे. उसाचा रस, लिंबूपाणी, ताक, शरबत यांसारख्या पेयांकडे नागरिकांचा कल वाढला असून, चौकाचौकांतील रसवंतीगृहांवर पुन्हा गर्दी उसळू लागली आहे. दुपारच्या वेळेत तर ग्राहकांच्या रांगा लागत असून, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच जण थंड दिलासा मिळवण्यासाठी या नैसर्गिक पेयांकडे वळत आहेत.

स्वस्त, सहज उपलब्ध आणि त्वरित ऊर्जा देणारा पर्याय म्हणून उसाचा रस नागपूरकरांच्या पसंतीस उतरला आहे.

विक्रेतेही ग्राहकांची चव जपण्यासाठी रसात लिंबू, आले, काळे मीठ यांचा वापर करत असून, त्यामुळे चव आणि ताजेपणा दोन्ही वाढत आहेत. कृत्रिम शीतपेयांना पर्याय म्हणून नैसर्गिक पेयांकडे वाढणारी पसंती हा सकारात्मक बदल मानला जात आहे. तथापि, या वाढत्या मागणीसोबत स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा समोर येत आहे. अनेक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात असून, दूषित पाणी किंवा अस्वच्छ बर्फामुळे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी पेय घेताना स्वच्छतेची खात्री करणे गरजेचे ठरत आहे.

स्वस्त आणि ताजेपणाचा पर्याय

सध्या वाढत्या उकाड्यामुळे उसाच्या रसाला मोठी मागणी आहे. दिवसाला शेकडो ग्राहक येत असून, विशेषतः दुपारच्या वेळेत प्रचंड गर्दी उसळते. ग्राहकांना चांगली चव आणि ताजेपणा मिळावा यासाठी रसात लिंबू, आले, काळे मीठ यांचा वापर केला जातो. अनेक ग्राहक आता बर्फाशिवाय रस घेण्यास प्राधान्य देत आहेत. २० ते ३० रुपयांत मिळणारा हा रस सर्वसामान्यांना परवडणारा आहे. मात्र, वाढत्या गर्दीसोबत स्वच्छता राखणे आमच्यासाठीही तितकेच महत्त्वाचे असल्याचे संगीता देवी पटेल रसवंती विक्रेत्यांनी सांगितले.

स्वच्छतेची खात्री करा, बर्फ टाळा

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी उसाचा रस अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यातील नैसर्गिक साखर आणि खनिजे शरीराला त्वरीत ऊर्जा देतात व थकवा कमी करतात. मात्र रस घेताना स्वच्छतेची खात्री करणे अत्यावश्यक आहे. विशेषतः बर्फाचा वापर टाळावा, कारण तो अनेकदा अशुद्ध असतो. दूषित बर्फामुळे संसर्गजन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो ताजा, स्वच्छ आणि बर्फाशिवाय रस घेणे अधिक सुरक्षित असल्याचे आहारतज्ज्ञ निकिता रामटेके यांनी स्पष्ट केले.

 

Related to this topic: