Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस

गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस यांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्याकडून गौरव

PSI Sheikh Khuddus: एक मे रोजी रात्री 8.30 ते 2 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार येथे देण्या-घेण्याच्या वाद


गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस यांचा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांच्याकडून गौरव

PSI Sheikh Khuddus |

जवळा बाजार (PSI Sheikh Khuddus) : एक मे रोजी रात्री 8.30 ते 2 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवळा बाजार येथे देण्या-घेण्याच्या वादातून अज्ञात हत्याराने डोक्यात वार करून एकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपी खून करून शेतात लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस (PSI Sheikh Khuddus) यांनी हिंगोली सायबर सेलच्या तांत्रिक साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. ड्रोनद्वारे शेत परिसराची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यात आला व अवघ्या 48 तासांच्या आत आरोपीस अटक करून जेरबंद करण्यात आले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस (PSI Sheikh Khuddus) यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. आपण केलेल्या कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करीत आहोत. भविष्यातही आपण अशीच उत्कृष्ट कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावाल, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.