Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

स्टुडन्ट पोलीस कॅडेट

डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत दामिनी पथकातर्फे स्टुडन्ट पोलीस कॅडेट हा कार्यक्रम संपन्न

Student Police Cadet: डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित स्टुडन्ट पोलीस कॅडेट कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कायदेशीर मार्गदर्शन देण्यात आले.


डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत दामिनी पथकातर्फे स्टुडन्ट पोलीस कॅडेट हा कार्यक्रम संपन्न

Student Police Cadet |

डोंगरकडा (Student Police Cadet) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्रशालेत दामिनी पथकातर्फे स्टुडन्ट पोलीस कॅडेट हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली तर्फे दामिनी पथक हिंगोली यांचे कडून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा डोंगरकडा येथे (Student Police Cadet) स्टुडंट पोलीस कॅडेट हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक देवानंद मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील अडकिने, उपाध्यक्ष गजानन गावंडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रेमलता जगताप, पोलीस कॉन्स्टेबल आरती साळवे, पोलीस हवालदार हिम्मतराव सरनाईक जिल्हा दामिनी पथक हे उपस्थित होते.

याप्रसंगी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप  यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलींची छेडछाड, विनयभंग यासंबंधीच्या कायद्याची माहिती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या मुलींच्या फसवणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच सोशल मीडियाचा गैरवापर विद्यार्थ्यांनी करू नये असा संदेश आपल्या भाषणातून दिला. डायल 112,बाबत तसेच good touch bad touch बाबत माहिती दिली.

तसेच मुलींना तक्रारी पेटी,पोलीस दीदी बाबत माहिती दिली. तसेच मुलांनी या वयामध्ये होणारे शारीरिक मानसिक व भावनिक बदल लक्षात घेऊन त्या प्रमाणे वर्तन करणे योग्य आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या वर होणारा अन्याय अत्याचार लपवू नका,बालविवाह करू नका, कोणी बळजबरी करत असेल तर त्यांचेवर गुन्हा दाखल होईल,कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास तुमचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध बोडले  यांनी तर आभार सतीश लवांडे यांनी मांडले.

Related to this topic: