Balaji Urban: बालाजी अर्बनतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष नारायणराव खरात यांनी विद्यार्थ्यांना उद्योगसिद्धी व मेहनताचे महत्त्व सांगितले.
बालाजी अर्बनतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
चिखली (Balaji Urban) : गुणवंत विद्यार्थी हेच देशाचे भविष्य व आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि शिस्त यांच्या जोरावर यश संपादन करून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन (Balaji Urban) बालाजी अर्बनचे अध्यक्ष नारायणराव खरात यांनी केले. सामाजिक उपक्रमात सदा अग्रेसर आयएसओ मानांकित जिल्ह्यातील अग्रगण्य बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चिखली द्वारा दि 29 मे रोजी संस्थेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर पालकांना पुष्पगुच्छ व शांल देण्यात आली कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण लड्डा, कार्यकारी संचालक गोपाल शेटे, जेष्ठ संचालक सुदर्शन भालेराव, नारायण भवर, प्रताप खरात, आनंद जाधव, जुलाल सिंग परिहार, पुष्पाताई राजपूत तसेच संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक सुदर्शन भालेराव यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आजच्या या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे राष्ट्रपती पंतप्रधान वैज्ञानिक दडलेले असून पालकांनी आपल्या पाल्यांवर आपल्या स्वप्नांची ओझी न टाकता त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना क्षेत्र निवडू द्यावे व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत लागल्यास बालाजी अर्बन सदैव प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभी असेल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
यावेळी सारंग चंद्रकांत पाटील, वैभवी विठ्ठल देशमाने, श्रद्धा राम जोशी, ओमकार रवींद्र सोनुने, प्रतीक गणेश खरात, आरती रामेश्वर खंडागळे, शारंग विनय जोशी, प्रियंका राजेश मेहेत्रे
युवराज सुरेश मेहेत्रे, प्रेम विष्णू जाधव, स्पृहा निलेश पापळकर आकांक्षा संजय डागे, मोहनराज राधेश्याम कुलकर्णी, समृद्धी अशोक नाईक, नैतिक संतोष क्षीरसागर, कु. दिव्या कल्याण तांबटकर, ओमराज सुनील झगडे, गौरव अनिल गाडे, प्रथमेश सचिन हाडे, हिमांशू सुधीर जगताप उत्कर्ष सुनील सालकुटे, कु. स्नेहल विक्रम शिवपूजे, सार्थक अमोल जोशी, प्रथमेश दंडे
ऋषिकेश संजय येंडोले आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जेष्ठ संचालक सुदर्शन भालेराव यांनी सूत्रसंचालन सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक सरव्यवस्थापक अशोक नाईक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर व्यवस्थापक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ अधिकारी रमेश देशमुख, अधिकारी सुनील शिंदे, संगणक विभाग प्रमुख विष्णू इंगळे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.