Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोला रुग्णालयातील स्ट्रेचर न मिळाल्याचा गंभीर आरोप;पतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेने मांडली व्यथा

जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


अकोला रुग्णालयातील स्ट्रेचर न मिळाल्याचा गंभीर आरोपपतीला पाठीवर घेऊन फिरणाऱ्या महिलेने मांडली व्यथा

Stretcher Unavailable |

अकोला (Stretcher Unavailable) : जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील एका व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रेन स्ट्रोकग्रस्त पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर स्ट्रेचर उपलब्ध न झाल्याने पत्नी माधुरी हरिजन यांनी पती संजय हरिजन यांना पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात मदतीसाठी धावपळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

या प्रकरणानंतर प्रथमच माध्यमांशी संवाद साधताना माधुरी हरिजन यांनी त्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाबाबत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर अनेकदा विनंती करूनही स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने त्यांनी स्वतः पतीला पाठीवर उचलून उपचारासाठी विविध विभागांत नेण्याचा प्रयत्न केला.

मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या हरिजन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याचे सांगितले जाते. कुटुंबात चार अपत्ये असून उपजीविकेची मोठी कसरत करावी लागते. काही वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याने संजय हरिजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले होते. याचवेळी स्ट्रेचरच्या अभावामुळे हा संपूर्ण प्रकार घडल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पातळीवर या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणानंतर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पराग गवई यांनी हरिजन कुटुंबाचा शोध घेत त्यांना मदतीचा हात दिला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे संजय हरिजन यांना अखेर अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

सध्या तीन डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयांतील मूलभूत सुविधा, रुग्णसेवेची गुणवत्ता आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेबाबत पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

Related to this topic: