Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Stray Dogs

कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास; नागरिकांमध्ये संताप

कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास नागरिकांमध्ये संताप

Stray Dogs |

कळमनुरी (Stray Dogs) : कळमनुरी शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांवरही मोकाट कुत्रे धावून येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे चावण्याच्या घटना किंवा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नगरपालिका प्रशासनाने तातडीने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

Related to this topic: