Risod Road Encroachment: वाशिम चौकातील स्टेट बँकेसमोर रस्त्यावर थेट अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे. संभाजी ब्रिगेडने गुन्हा दाखल करण्याची व अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
रिसोड (Risod Road Encroachment) : शहरातील वाशिम चौक परिसर, सेनगाव रोड येथे असलेल्या स्टेट बँक शाखेसमोर करण्यात आलेल्या रॅम्प व पायऱ्यांच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला असून, रस्त्यावर थेट अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विनोद केशवराव पाचरणे यांनी संबंधित विभागांना कडक शब्दांत तक्रार सादर केली आहे.
पाचरणे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बँकेत बदलीवर आलेले शाखा व्यवस्थापक प्रसाद व क्षेत्रीय व्यवस्थापक आशिष सिंग यांनी ग्राहक हित डावलून संगनमताने नियमबाह्य कामे केल्याचा ठोस आरोप करण्यात आला आहे. शाखा दुरुस्तीच्या नावाखाली करण्यात आलेल्या बदलांमध्ये अपंगांसाठी उभारलेला रॅम्प व पायऱ्या थेट रस्त्यावर येत असून, सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, या (Risod Road Encroachment) कामासाठी स्थानिक परवानगी, तांत्रिक मंजुरी, मंजूर अंदाजपत्रक व खर्च मंजुरी घेतली गेली का? याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. बँकेसमोर योग्य पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असून, त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
या (Risod Road Encroachment) प्रकरणात संबंधित अधिकारी व बँक प्रशासनावर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अतिक्रमण तात्काळ हटवून रॅम्प नियमांनुसार पुन्हा बांधण्याचे आदेश द्यावेत, अशीही भूमिका घेण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने तक्रारीची दखल न घेतल्यास, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पाचरणे यांनी दिला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलीस प्रशासन तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार पाठवण्यात आली असून, प्रशासन आता कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.