Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

ST Bus Accident

परभणीत चांदजजवळ एसटी बस पलटली; २६ प्रवासी जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

परभणी जिल्ह्यातील जिंतूर-परभणी मार्गावरील चांदज गावाजवळ गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी एसटी बसचा अपघात होऊन २६ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.


परभणीत चांदजजवळ एसटी बस पलटली २६ प्रवासी जखमी तिघांची प्रकृती गंभीर

ST Bus Accident |

परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर-परभणी मार्गावरील चांदज गावाजवळ गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी एसटी बसचा अपघात होऊन २६ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. यापैकी दोन ते तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून जिंतूर येथे आलेली एसटी बस गुरुवारी (दि. ३० जुलै) सकाळी सुमारे ९ वाजता जिंतूरहून परभणीकडे ४१ प्रवाशांना घेऊन निघाली होती. चांदज गावाच्या अलीकडे समोर अचानक वाहन आल्याने बसचालकाने जोरात ब्रेक लावला. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पलटी झाली.

या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे, डॉ. खाडे, डॉ. भुत्ते, डॉ. बामणे आणि डॉ. परिहार यांनी जखमींवर तातडीने उपचार केले.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: