Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणीतील सेलू परिसरात सोलर पंपाचे वायर, विद्युत मोटारी चोरणारी टोळी जेरबंद


परभणीतील सेलू परिसरात सोलर पंपाचे वायर विद्युत मोटारी चोरणारी टोळी जेरबंद

Solar Wire Theft |

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन गुन्ह्यांची उकल, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

सेलू (Solar Wire Theft) : सेलू तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोलर प्लांटवरील वायर तसेच शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना परभणी स्थानिक गुन्हे शाखा यांनी आंतरजिल्हा वायर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक शुक्रवार, २२ मे रोजी सेलू आणि पाथरी परिसरात चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला एका गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परतूर येथील पारधी वाडा परिसरातून अर्जुन रजनी चव्हाण या संशयिताला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अर्जुन चव्हाण याने अखेर आपल्या इतर साथीदारांसह मिळून सेलू येथील पाथरी रोडवरील मंजित जिनिंग परिसर आणि वालूर शिवारातील सोलर प्लांटवरील वायर, प्लेट्स तसेच पाण्याच्या विद्युत मोटारी चोरल्याची कबुली दिली.

आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल आष्टी येथील एका व्यापाऱ्याला विकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या गुन्ह्यातील ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन मोठ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, तसेच पोलीस अंमलदार विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, नामदेव दुबे, राम पोळ, गजानन क्षीरसागर आणि हनवते यांनी मोलाची भूमिका बजावली.

पोलीस प्रशासनाच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरातील सोलर प्लांट चालक आणि शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध आता सेलू पोलीस घेत आहेत.

Related to this topic: