Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

सोलर स्ट्रीट लाईट

शिवाणकर चौक ते आवास योजनेचा मार्ग उजळला; सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

Solar Street Light: नागपूरमधील शिवाणकर चौक ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गावर सोलर स्ट्रीट लाईटची सुविधा सुरू झाली आहे. यामुळे रात्रीच्या सुरक्षिततेत व वाहतुकीत सुधारणा झाली आहे.


शिवाणकर चौक ते आवास योजनेचा मार्ग उजळला सोलर स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

Solar Street Light |

 

महिला भगिनी, नागरिक तसेच युवा शिव प्रतिष्ठान यांच्या मागणीला अखेर मूर्तरूप प्राप्त

नागपूर (Solar Street Light) : बिडगाव नगरपंचायत वॉर्ड क्र. 14 मधील शिवाणकर चौक ते प्रधानमंत्री आवास योजना (खासरा क्र. 62) या मुख्य मार्गावर अखेर सोलर स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध झाली असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला मूर्तरूप मिळाले आहे. महिला भगिनी, स्थानिक नागरिक तसेच युवा शिव प्रतिष्ठान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे उपक्रम साकार झाले आहे.

आज दि. 04 एप्रिल 2026 रोजी या सोलर स्ट्रीट लाईटचे (Solar Street Light) लोकार्पण उत्साहात पार पडले. यावेळी मा. नगराध्यक्ष वीरू जमगडे (न. पं. बिडगाव), सभापती प्रीतम बोकडे, नगरउपाध्यक्ष निकेश कातुरे, सभापती संतोष तिजारे, मनोनीत नगरसेवक अजय बिसेन यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आशिष मल्लेवर, पुंडलिक कुर्वेकर, संजय आणसाने, राजेश पुरी, अतुल वंजारी उपस्थित होते.

तसेच युवा मोर्चा पदाधिकारी राहुल चांभारे, जितेंद्र इंदूरकर, महेंद्र वरखडे, अंकित वांढरे, भाजपा महिला पदाधिकारी मायाताई वसेकर, कामिनी नागपुरे, सोमवंशी ताई तसेच भाजपा कार्यकर्ते आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या (Solar Street Light) कामासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे नागरिकांनी आभार मानले. तसेच नगराध्यक्ष वीरू जमगडे, वॉर्ड क्र. 14 चे नगरसेवक प्रीतम बोकडे आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.

या (Solar Street Light) सोलर स्ट्रीट लाईटमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेत आणि रात्रीच्या वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

Related to this topic: