Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

SIR Form

हिंगोलीतील प्रभाग क्र. ८ मध्ये एसआयआर फॉर्म भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये १५ जुलै रोजी एसआयआर (SIR) फॉर्म भरण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.


हिंगोलीतील प्रभाग क्र ८ मध्ये एसआयआर फॉर्म भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SIR Form |

राजस्थान व्यायाम शाळेत आयोजित शिबिरात ४०० नागरिकांनी भरले एसआयआर फॉर्म

हिंगोली : हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये १५ जुलै रोजी एसआयआर (SIR) फॉर्म भरण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक कपिल खंडेलवाल आणि नगरसेविका डॉ. सुरभी भरत चौधरी पहेलवान यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंगोली येथील राजस्थान व्यायाम शाळा येथे प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांसाठी एसआयआर फॉर्म भरण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार श्रीकांत भुजबळ तसेच नगरपालिकेचे उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान यांनी शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

या शिबिरामध्ये सुमारे ४०० नागरिकांनी एसआयआर फॉर्म भरले. शिबिराच्या आयोजनासाठी घनशाम शर्मा, युवानेते सागर खंडेलवाल, राघव खंडेलवाल, सचिन शर्मा तसेच नगरसेवक कपिल खंडेलवाल मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कंदी, डोल्हारे, कोटकर, शिंदे, राजपूत, सोंडगीर आणि कल्याणकर या बीएलओंनी (BLO) मतदारांकडून एसआयआर फॉर्म भरून घेण्याचे काम केले.

Related to this topic: