Sinnar Terrible Accident: चिखली तालुक्यातील खैरव येथे राहणाऱ्या तीन युवकांचा सिन्नरमध्ये अपघातात मृत्यू झाला. या तिघांची कार कंटेनरला धडकून अपघात झाला. गावातील लोकांमध्ये शोककळा पसरली.
चिखली (Sinnar Terrible Accident) : चिखली तालुक्यातील खैरव येथील तीन युवकांचा सिन्नर (जि. नाशिक) येथे (Sinnar Terrible Accident) भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास सिन्नर एमआयडीसी परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खैरव येथील वैभव रामदास शिंदे यांच्या जेसीबीसाठी साहित्य आणण्यासाठी वैभव शिंदे, चालक श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) व संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे तिघे सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. दरम्यान, सिन्नर एमआयडीसी परिसरात उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या कारची जोरदार धडक बसल्याने हा (Sinnar Terrible Accident) भीषण अपघात झाला. या अपघातात संकेत प्रकाश खोसे व श्रीकिसन हनुमान सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव रामदास शिंदे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खैरव गावाचे सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी तात्काळ सिन्नरकडे धाव घेतली. दरम्यान, संकेत खोसे यांच्यावर २६ एप्रिल रोजी सकाळी खैरव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून श्रीकिसन सुरुशे व वैभव शिंदे यांचे मृतदेह गावात येणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. या (Sinnar Terrible Accident) दुर्दैवी घटनेमुळे खैरव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.