Topper Shweta Kale: वाडेगावच्या श्री. जागेश्वर विद्यालयातील कु. श्वेता काळे यांनी 93.40% गुण मिळवून प्रथम स्थान प्राप्त केले. त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या शिक्षकांना व कुटुंबीयांना जाते.
बाळापुर/वाडेगाव (Topper Shweta Kale) : बाळापुर तालुक्यातील तामसी येथील, कु. श्वेता गोपालराव काळे या विद्यार्थिनीने 93.40 गुण मिळवतश्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव येथून टॉपर ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या निकालात, बाळापुर तालुक्यातील श्री जागेश्वर विद्यालय वाडेगाव तथातामसी गावातील शेतकरी कुटुंबातीलकु. श्वेता गोपालराव काळे हिने 93.40% गुण मिळवित गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले.
या विद्यालयातून सर्वात जास्त गुण मिळवत तिने प्रथम क्रमांक मिळवत गुणवत्ता यादी स्थान मिळविले. श्रेया काळे (Topper Shweta Kale) हिला मराठीत 87 हिंदीत 88 इंग्रजीत 88 गणितात 96 विज्ञान व तंत्रज्ञान 96 आणि सामान्य विज्ञान 96 अशा प्रकारचे विविध विषयात गुण मिळवत 93.40% गुण मिळाले आहेत. आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, वर्गशिक्षक शिक्षकगण आई वडील व बहिण भावांच्या मार्गदर्शनात मिळाले. तामसी सारख्या लहानशा गावातून शेतकऱ्यांच्या मुलीने मोठ्या प्रमाणात गुणवत्ता प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.