Shripad Garudi: श्रीपाद गारुडी, जिल्हा परिषदेच्या लेखा व्यवस्थापक, यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सम्मानित केले.
हिंगोली (Shripad Garudi) : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एनआरएचएम विभागातील लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी (Shripad Garudi) यांनी मागील तीन वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत क्षय रुग्णांना फूड बास्केट देऊन रुग्णांना आधार दिला. त्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सीईओ विवेक गायकवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सोमवारी गौरव करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (ता. 31)क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते आशा स्वयंसेविका, यासह उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्षातील लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी (Shripad Garudi) यांनी निश्चय मित्र योजने अंतर्गत सतत मागील तीन वर्षा पासून क्षय रुग्णांना फूड बास्केट देऊन रुग्णांना आधार दिला. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत क्षय रोगाना कुटुंबीय म्हणून धीर दिला. वास्तविक पाहता आपले नियमित काम करीत सामाजिक जीवनात काहीतरी करावे हा डोळस उद्देश समोर ठेवत क्षय रुग्णांची सेवा करण्यात फार मोठे योगदान आहे. त्याच कामाची दखल घेत आरोग्य विभागाने गौरव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या उपस्थितीत प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला.
श्रीपाद गारुडी (Shripad Garudi) यांनी अगळा वेगळा उपक्रम राबवित असल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता ही पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात श्रीपाद गारुडी (Shripad Garudi) यांचे अभिनंदन केले जात आहे.