Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

श्री शिवाजी महाविद्यालयातील 35 कॅडेटची सैन्य व पोलीस दलात निवड; 120 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात उल्लेखनीय यश संपादन केले.


श्री शिवाजी महाविद्यालयातील 35 कॅडेटची सैन्य व पोलीस दलात निवड 120 विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी

Shri Shivaji College Chikhli |

चिखली (Shri Shivaji College Chikhli) : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारे संचालित श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात उल्लेखनीय यश संपादन केले असून, चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील 35 एनसीसी कॅडेटची भारतीय सैन्य दल व महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच विविध कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत महाविद्यालयाने नवा आदर्श निर्माण केला आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे तसेच 13 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, खामगावचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला आणि ट्रेनिंग जेसीओ रवण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी अधिकारी लेफ्टनंट किरण पडघान हे एनसीसी युनिट प्रभावीपणे चालवत आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या छत्रपती संभाजीनगर एआरओच्या निकालानुसार महाविद्यालयातील 11 कॅडेटची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या निकालात 14 कॅडेटची महाराष्ट्र पोलीस दल व एसएसआर नेव्हीमध्ये निवड झाली होती. यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण 35 विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस दलात संधी मिळाली असून त्यांना नियुक्तीपत्रे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याशिवाय करिअर कट्टा उपक्रमांतर्गत डॉ. एस. एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नामांकित कंपन्यांमध्ये 86 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली आहेत.

महाविद्यालयाने चालू शैक्षणिक वर्षात सैन्य, पोलीस व विविध खासगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मिळून सुमारे 120 विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे रोजगारनिर्मिती व विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, हा महाविद्यालयासाठी तसेच चिखली शहरासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.

या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेची कार्यकारिणी परिषद, आजीवन सदस्य, प्राचार्य डॉ. प्रमोद आर. पडोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप उन्हाळे, लेफ्टनंट किरण पडघान, डॉ. एस. एन. पवार, प्रा. तृप्ती श्रीरामे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related to this topic: