Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

श्री हनुमान जन्मोत्सव

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह

Shri Ram Navami: टेकाडीत श्री हनुमान मंदिरात श्रीराम नवमी ते हनुमान जयंती दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजनात आहे, सहभागी भजन मंडळांसह विविध कार्यक्रमांचे ठिकाण.


श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह 

Shri Ram Navami |

कन्हान (Shri Ram Navami) : श्री हनुमान मंदीर देवस्थान टेकाडी व्दारे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान मंदीर टेकाडी येथे पहारा भजन मंडळासह अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून श्री हनुमान जयंती ला दहीकाला व भव्य महाप्रसाद वितरण करून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 
           
दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे श्री राम नवमी (Shri Ram Navami) ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गुरूवार (दि.२६) मार्च ते गुरुवार (दि.२) एप्रिल २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्यापुर्वी बुधवार (दि.२५) मार्च ला सायंकाळी श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात बैलगाडीवर मनमो हक, राम, सिता, लक्ष्मण यांची सजीव झाकी, पादुका पालखी, सोबत रामसरोवर अखाडा, हनुमान झाकी, रामरथ, डी जे, बँड व महिला भजन मंडळा सोबत मनमोहक शिव तांडव नुत्य, महाकाल रुप देखिल लोकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले.

गुरूवार (दि.२६) मार्च ला सकाळी पासुन रोज २४×७ च्या स्वरुपात नित्य सात दिवस भजनी मंडळांचा पहारा भजना ने अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. यात हुड मोहल्ला भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय मा दुर्गा भजन मंडळ, श्री मारोती नंदन भजन मंडळ, आरती गन भजन मंडळ, जय रघुनं दन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ आदि चा समावेश आहे. गुरूवार (दि.२) एप्रिल ला दुपारी १ वा, भव्य महाआरती करुन दंहीहंडी फोडुन दहिका ल्याचा प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. आणि सायंकाळी ५ वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या (Shri Ram Navami) कार्यक्रमास पंचकोशीतील भाविक मंडळीनी बहु संख्येने उपस्थित होऊन श्री हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी व्दारे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पंढरीजी बाळबुधे, गोपिनाथ गुरधे, मनोज लेकुरवाळे, बंडु इंगळे, जयदेव सातपैसे, नागो राव गोरले, मोतिराम सातपैसे, देवेंद्रसिंग सेंगर, मनोज गुरधे, सुर्यभान कुंभलकर सह समस्थ टेकाडी ग्रामस्थ सहकार्य करित आहे.

Related to this topic: