Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

महाराजस्व समाधान शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चिखलीत यशस्वी

Maharajswa Samadhan Camp: चिखलीत आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर'मध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा प्रदान केल्या गेल्या.


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चिखलीत यशस्वी

Maharajswa Samadhan Camp |

 

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या शासकीय सेवा

चिखली (Maharajswa Samadhan Camp) : 'सर्व महसुली सेवा एकाच ठिकाणी, एकाच दिवशी' या संकल्पनेवर आधारित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' टप्पा क्र. ०१ चे आयोजन आज चिखली तहसील येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्वक पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस व महसूलमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा (Maharajswa Samadhan Camp) जनहितकारी उपक्रम चिखली विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व पुढाकारामुळे हे शिबिर मतदारसंघात साकार झाले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत सहभाग नोंदवत शिबिराच्या यशस्वी आयोजनात योगदान दिले.

शिबिरात महसूल विभागाचे विविध दाखले व प्रमाणपत्रे, घरकुल योजना, महिला बचत गट लाभ, पीएम किसान नोंदणी, विवाह नोंदणी, दिव्यांग व माजी सैनिकांसाठीच्या सुविधा अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना तत्काळ व एकाच ठिकाणी देण्यात आला. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचवणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शिबिराचे उद्घाटन अंकुशराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मा. पंडितदादा देशमुख होते. तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी  प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, उपनगराध्यक्ष वैशालीताई कपिल खेडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सुषमाताई चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, दीपक खरात, डॉ. महमद इसरार, श्रीमती ज्योतीताई वाळेकर, बाळू जाधव, राम बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, कैलास खराडे, नायब तहसीलदार मुरली गायकवाड, अर्जुन इंगळे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी अनिरुद्ध खेडेकर, पुरवठा अधिकारी श्रीमती सोनकाबळे, विस्तारक सिद्धेश्वर ठेंग, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, शेख आसिफ भाई यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Related to this topic: