Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > मुंबई

Shiv Sena UBT

मुंबईत ठाकरेसेनेला मोठा धक्का; विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

मुंबईच्या राजकारणात शिवसेना (UBT)ला मोठा धक्का बसला आहे.


मुंबईत ठाकरेसेनेला मोठा धक्का विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द

Shiv Sena UBT |

जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप; पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची नगरविकास विभागाला माहिती

मुंबईच्या राजकारणात शिवसेना (UBT)ला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले असून, पुढील सहा वर्षांसाठी त्यांना नगरसेवकपदाची निवडणूक लढवता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाला पत्र पाठवले आहे. लवकरच महापालिका सभागृहात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

विशाखा राऊत यांनी २०२६च्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडणूक लढवली होती. हा प्रभाग मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होता. त्यामुळे निवडणुकीसाठी त्यांनी जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते.

मात्र, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या प्रिया सरवणकर यांनी विशाखा राऊत यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप नोंदवला. याबाबत त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करत राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या दाव्याची तपासणी करण्याची मागणी केली होती.

या प्रकरणानंतर आता महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नगरविकास विभागाला पाठवलेल्या पत्रात विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याचे कळवले आहे. तसेच, पुढील सहा वर्षे नगरसेवकपदाच्या निवडणुकीसाठी त्या अपात्र राहतील, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक १९१ हा दादर-माहिम परिसरातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. सेनाभवन, शिवाजी पार्क आणि सिद्धिविनायक मंदिर यांसारखी महत्त्वाची ठिकाणे या परिसराशी जोडलेली आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर हा पक्षाच्या राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीतील प्रमुख केंद्र राहिला आहे. सेनाभवन हे पक्षाच्या संघटनात्मक हालचालींचे महत्त्वाचे केंद्र, तर शिवाजी पार्क हे मोठ्या सभा आणि दसरा मेळाव्यांमुळे शिवसेनेच्या राजकीय शक्तीचे प्रतीक मानले जाते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादरच्या राजकारणाचे महत्त्व आणखी वाढले. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्षाचा परिणाम या पारंपरिक शिवसेना प्रभावक्षेत्रावरही दिसून आला. त्यामुळे प्रभाग १९१ मधील निवडणुकीकडे दोन्ही गटांचे विशेष लक्ष होते.

२०२६च्या निवडणुकीत या प्रभागातून शिवसेना (UBT)च्या विशाखा राऊत विजयी झाल्या होत्या. त्यांना १३,२३६ मते, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया सरवणकर यांना १३,०३९ मते मिळाली होती. अवघ्या १९७ मतांच्या फरकाने राऊत यांनी विजय मिळवला होता.

प्रिया सरवणकर या माजी आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटातील राजकीय संघर्षासोबतच दोन प्रभावी राजकीय कुटुंबांच्या पार्श्वभूमीचीही चर्चा झाली होती. आता विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग १९१च्या राजकीय समीकरणांना नव्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related to this topic: