MLA Santosh Bangar: हिंगोळ्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे गटाकडे संजय राऊत या नामांकनावर जोरदार टीक्याच्या आघाडीवर असलेल्या आरोपांचे उल्लेख
हिंगोली (MLA Santosh Bangar) : शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला वळंबा आहे, असा घणाघाती आरोप बांगर यांनी केला आहे.
यावेळी प्रसार माध्यमशी बोलताना हिंगोली चे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) म्हणाले की, खा.संजय राऊत यांच्या दररोजच्या वक्तव्यांमुळे उद्धव ठाकरे गटाची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे. राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे बोलतात त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यांची वक्तव्ये पक्षाला अडचणीत आणणारी ठरत आहेत.
आमदार बांगर (MLA Santosh Bangar) यांनी पुढे सांगितले की, संजय राऊत यांच्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आणि सामान्य जनतेचा विश्वासही उडत आहे. उद्धव ठाकरे यांनी राऊत यांना वेळीच आवरले नाही तर पक्षाला आणखी मोठा फटका बसेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडली. ‘ऑपरेशन टायगर’नंतर राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याचा पुनरुच्चार करताना बांगर यांनी विरोधकांना लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढीवरून हात फिरवला की विषय संपतो, असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णय क्षमतेवर भर दिला.