Shindephal fierce fire: शिंदेफळमध्ये भीषण आग आणि सिलेंडर स्फोटात दोन कुटुंबांना मोठे नुकसान झाले. शिवाजी मुटकुळे यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून मदतीचे आश्वासन दिले.
शिवाजी मुटकुळे घटनास्थळी दाखल
हिंगोली (Shindephal fierce fire) : सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे मंगळवारी भीषण आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली. या स्फोटात विनोद नारायण लोणकर आणि काशिनाथ सखाराम तृप्पमाने यांच्या घराचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी तानाजीराव मुटकुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांची भेट घेत त्यांना धीर दिला आणि झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
नुकसानग्रस्त कुटुंबांना (Shindephal fierce fire) तातडीने मदत मिळावी यासाठी मुटकुळे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. अशा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्परतेने दिलासा देणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या (Shindephal fierce fire) प्रसंगी गावातील नागरिक, विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.