Lakhan Singh Thakur: वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बियाणे कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आर्थिक अडचणीत. लखन सिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता तपासणीसाठी निवेदन केले.
कारवाईसाठी लखन सिंह ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
रिसोड (Lakhan Singh Thakur) : वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बियाणे कंपन्यांच्या धोरणांमुळे आणि जाचक अटींमुळे मोठ्या अडचणीत सापडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव (उत्तर भारतीय) लखन सिंह ठाकूर (Lakhan Singh Thakur) यांनी याप्रश्नी आवाज उठवला असून, राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि त्या तुलनेत अपेक्षित दर्जा न मिळणे यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्याने बळीराजा आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच बियाणे कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या करारांमध्ये अत्यंत कठोर अटी लादल्या जात असून त्यात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोप लखन सिंह ठाकूर (Lakhan Singh Thakur) यांनी केला आहे.
अनेक शेतकऱ्यांना या करारांमधील कायदेशीर आणि किचकट अटी समजत नसल्याने बियाणे कंपन्यांकडून त्यांचा सर्रास गैरफायदा घेतला जात असल्याचेही त्यांनी या निवेदनात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या मध्ये बाजारपेठेतील बियाण्यांची कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि पिळवणूक करणाऱ्या दोषी बियाणे कंपन्यांवर कडक कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नवीन आणि स्पष्ट नियमावली त्वरित लागू करावी, आदी आहेत