Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सेनगाव शहराच्या वैभवात भर

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवस्मारकाचा अंतिम आराखडा तयार

Sengaon Shiv Memorial: सेनगाव येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे.


गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिवस्मारकाचा अंतिम आराखडा तयार

Sengaon Shiv Memorial |

अभियंता विजय कोटकर यांनी साकारले अश्वारूढ पुतळ्याचे डिझाईन 
लोक सहभागातून स्मारकाची उभारणी होणार

सेनगाव (Sengaon Shiv Memorial) : सेनगाव येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. गुरुवार, १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या अत्यंत शुभमुहूर्तावर, प्रस्तावित अश्वारूढ पुतळ्याचे 'फायनल डिझाईन' (अंतिम आराखडा) प्रशासकीय स्तरावर प्राप्त झाले आहे. प्रसिद्ध इंजिनियर विजय कोटकर यांनी हे भव्य आणि देखणे डिझाईन तयार केले असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सेनगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे शिवस्मारक (Sengaon Shiv Memorial) उभारले जाणार आहे. इंजिनियर विजय कोटकर यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार, हा अश्वारूढ पुतळा अत्यंत कलात्मक आणि शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारा असेल. या स्मारकामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे प्रेरणास्थान ठरेल.

height=500

हे भव्य स्मारक (Sengaon Shiv Memorial) लोकसहभागातून आणि सर्वांच्या योगदानातून साकारले जाणार आहे. "आपल्या आराध्य दैवताचे स्मारक सर्वांच्या मदतीने उभे राहावे," या उद्देशाने शिवस्मारक समितीच्या वतीने सेनगाववासीयांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने शक्य होईल ती देणगी देऊन या ऐतिहासिक कार्यात आपला खारीचा वाटा उचलावा, असे विनंतीवजा आवाहन करण्यात आले असुन शिवप्रेमी कडुन प्रतिसाद मिळत आहे.

डिझाईन फायनल झाल्यामुळे आता प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आवश्यक तो निधी आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून तातडीने कामाला सुरुवात केली जाणार आहे. या (Sengaon Shiv Memorial) स्मारकामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मिळालेली ही बातमी सेनगावसाठी एक मोठी भेट मानली जात आहे.

Related to this topic: