Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भूमी अभिलेख कार्यालय

तारीख पे तारीख...! सेनगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या संथ कारभाराने शेतकरी हैराण

Land Records Office: सेनगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत; नियमित मोजणीसाठी तारीख देण्यात येते परंतु कर्मचारी पोहोचत नसल्याने समस्या वाढत आहेत.


तारीख पे तारीख सेनगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या संथ कारभाराने शेतकरी हैराण

Land Records Office |

 

मोजणीसाठी शुल्क भरूनही कामे रखडली; वारंवार चकरांमुळे नागरिकांमध्ये नाराजी

सेनगाव (Land Records Office) : “आज कर्मचारी उपलब्ध नाहीत…”, “पुढील आठवड्यात या…”, “अधिकाऱ्यांची बैठक आहे…” अशी विविध कारणे ऐकत सेनगाव तालुक्यातील शेतकरी व नागरिक उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या दारात अक्षरशः हेलपाटे मारताना दिसत आहेत. जमीन मोजणीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी शासनाने निश्चित मुदत ठरवून दिली असतानाही प्रत्यक्षात मात्र कामांना होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेनगाव तालुका ठिकाणी कार्यरत असलेल्या उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे तालुक्यातील विविध गावांमधून शेतजमिनी, प्लॉट, बांधकाम जागा तसेच हद्दविवादासंदर्भातील मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर येतात. (Land Records Office) शासकीय नियमानुसार नियमित मोजणीसाठी ९० दिवसांचा तर द्रुतगती मोजणीसाठी ३० दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक नागरिक शुल्क भरूनही महिनोनमहिने प्रतीक्षा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मोजणीसाठी तारीख देण्यात येते; परंतु संबंधित दिवशी कर्मचारी पोहोचत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही वेळा “तांत्रिक अडचण”, “मनुष्यबळाची कमतरता” किंवा “इतर कामांमुळे विलंब” अशी कारणे सांगून पुन्हा नवीन तारीख देण्यात येत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांची जमीन खरेदी-विक्री, पीक कर्ज, वारस नोंद, बांधकाम परवानगी तसेच न्यायालयीन प्रकरणे ही मोजणी अहवालावर अवलंबून असतात. मात्र मोजणीच वेळेत होत नसल्याने अनेक व्यवहार रखडत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. काही ठिकाणी हद्दविवाद अधिक तीव्र होत असल्याने सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. (Land Records Office) कार्यालयात स्पष्ट माहिती मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. वारंवार कार्यालयाच्या चकरा मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही नागरिकांनी मोजणी प्रक्रियेत पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले असून, प्राधान्यक्रमाबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

दरम्यान, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे (Land Records Office) प्रमुख अधिकारी आठवड्यातून मर्यादित दिवस सेनगाव येथे उपलब्ध राहत असल्याने प्रलंबित कामांचा ताण वाढत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यासारख्या विस्तीर्ण क्षेत्रासाठी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था आणि मर्यादित उपस्थितीमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. शेतकरी व नागरिकांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत मोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच कार्यालयीन कामकाज अधिक पारदर्शक व जबाबदार बनवावे, अशी मागणी केली आहे.

सेनगाव येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात (Land Records Office) जमीन व प्लॉट मोजणीसाठी रितसर शुल्क भरूनही निश्चित तारखेला कामे होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. हातातील कामे सोडून कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व नागरिकांना पुन्हा पुढील तारीख देऊन परत पाठविले जात असल्याने नाराजी वाढत आहे. गरीब शेतकऱ्यांची मोजणीची कामे वेळेत होत नसतील तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख संतोष देवकर यांनी दिला आहे.

Related to this topic: