Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वन विभाग बचावकर्य

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान; प्राणीमित्र व वन विभागाची तत्परता

Forest Department rescue: सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे एक कोल्हा शेतातील वihर्यात पडला होता. वन विभाग आणि स्थानीय प्राणमित्रांनी संयुक्त प्रयत्नांद्वारा कॉल्ह्याला जिवंत बाहेर आणले


विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान प्राणीमित्र व वन विभागाची तत्परता

Forest Department rescue |

सेनगाव (Forest Department rescue) : पाण्याच्या शोधात भटकत असताना विहिरीत पडलेल्या एका कोल्ह्याला प्राणीमित्र व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढत जीवनदान दिल्याची घटना सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे घडली. या संवेदनशील आणि तत्पर बचावकारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पार्डी पोहकर येथील शेतकरी निवृत्ती खंदारे यांच्या शेतातील विहिरीत एक कोल्हा पडल्याचे निदर्शनास आले.

पाण्याच्या शोधात असताना तो विहिरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती मिळताच प्राणीमित्र सर्जेराव खंदारे यांनी वेळ न दवडता वन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळाल्यानंतर सेनगाव वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राणीमित्रांच्या मदतीने काळजीपूर्वक बचावकार्य (Forest Department rescue) राबवून कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. विहिरीबाहेर आल्यानंतर कोल्ह्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकत सुरक्षित मार्ग धरला.

दरम्यान, तालुक्यात यंदा अनेक भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून विहिरी व बोरवेल कोरड्या पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत वेळेवर केलेल्या या (Forest Department rescue) बचाव कारवाईमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने प्राणीमित्र आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: