Sengaon Go Samman Rally: सेनगावात 'गो सन्मान आह्वान अभियान' अंतर्गत शहरात रविवारी रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान गोवंशाला राष्ट्रीय माता दर्जा देण्याची
सेनगाव (Sengaon Go Samman Rally) : ‘गो सन्मान आह्वान अभियान’अंतर्गत सेनगाव शहरात रविवारी दि. २७ एप्रिल रोजी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागांतून निघालेली ही रॅली तहसील कार्यालयावर जाऊन धडकली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या (Sengaon Go Samman Rally) रॅलीत गोभक्त, संत समाजाचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “गोवंशाला राष्ट्रीय माता दर्जा द्या”, “गोसंवर्धनासाठी स्वतंत्र कायदा करा” अशा घोषणा देत शहर परिसर दणाणून गेला.
निवेदनात भारतीय संविधानातील अनुच्छेदाचा आधार घेत देशी गोवंशाला संवैधानिक संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने स्वतंत्र गोसंवर्धन मंत्रालय स्थापन करावे आणि देशभर एकसमान कायदा लागू करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. (Sengaon Go Samman Rally) रॅलीदरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करण्यात आले. या आंदोलनामुळे सेनगावात गोसंवर्धनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.