Self Census Campaign: पातूर शहरात शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयं जनगणना’ मोहिमेत नागरिकांनी पोर्टलवर नोंदणी करून आपली कुटुंबाची माहिती भरू शकतात.
पातूर (Self Census Campaign) : नागरिकांनी स्वतःची जनगणना स्वतः करण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या ‘स्वयं जनगणना’ मोहिमेबाबत पातूर नगर परिषदेकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. “तुमचे शहर, तुमची माहिती – चला, स्वतः जनगणना करूया!” या घोषवाक्याखाली नागरिकांना पोर्टलवर नोंदणी करून आपली व कुटुंबाची माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या (Self Census Campaign) मोहिमेअंतर्गत नागरिकांनी प्रथम अधिकृत पोर्टलवर मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सविस्तर माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. शेवटी अर्ज सबमिट करून ‘प्रोग्रेस आयडी’द्वारे त्याचा ट्रॅक ठेवता येणार आहे. नगर परिषदेकडून सांगण्यात आले की, अचूक जनगणना माहितीमुळे शासनाला विविध योजनांचे योग्य नियोजन करता येते. तसेच शहराच्या विकासासाठी आवश्यक डेटा उपलब्ध होतो आणि प्रशासनात पारदर्शकता वाढते. नागरिकांनी आजच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वयं जनगणना पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या (Self Census Campaign) उपक्रमासाठी प्रशासक तथा तहसीलदार डॉ. राहुल वानखडे, मुख्याधिकारी अक्षय गडसिंग आणि जनगणना २०२७ चे चार्ज अधिकारी सुनील उगले यांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “योग्य माहिती, समृद्ध पातूर!” या संदेशासह ही मोहीम राबविण्यात येत असून शहरातील सर्व नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.