Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

आमदार श्वेताताई महाले पाटील

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त चिखलीत अभिवादन; सावरकर स्मारक उभारणीची भावना व्यक्त

MLA Shweta Mahale Patil: चिखलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात आमदार श्वेताताई महाले पाटील, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे व नगराध्यक्ष पंडितराव देशमुख


स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त चिखलीत अभिवादन सावरकर स्मारक उभारणीची भावना व्यक्त

MLA Shweta Mahale Patil |

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त चिखली शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, तर नगराध्यक्ष पंडितराव देशमुख विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ, त्यागमय आणि प्रेरणादायी जीवन प्रत्येक भारतीयासाठी ऊर्जा देणारे असल्याचे सांगितले. चिखली शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी भावना सावरकर प्रेमींसह अनेक नागरिकांची असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी सावरकरांच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे यांनी केले, तर संचालक भिकू लोळगे यांनी आभार मानले. या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे, विजय खरे, श्याम वाकदकर, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: