Breaking News
  • "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा
  • अल निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाई होण्याची शक्यता
  • बारामती शहरात आता एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार
  • नाशिकमध्ये वाद मिटवण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
  • नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
  • परभणीत दाखल होताचा खासदार संजय जाधव यांना मिळणार Y+ सुरक्षा
  • बीडमध्ये FDA ची मोठी कारवाई; 6.68 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • पुणे- ग्रामीण जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
  • छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण

Minor Girl Abuse: सावरगावमध्ये १० वर्षीय मुलीवर अत्याचाराच्या घटनेमुळे समाज हादरला. खासदार अनुप धोत्रे यांनी भेट देऊन न्यायासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


सावरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण

Minor Girl Abuse |

खासदार अनुप धोत्रे यांची पीडित कुटुंबाला भेट; न्यायासाठी प्रयत्नांचे आश्वासन

पातूर (Minor Girl Abuse) : तालुक्यातील सावरगाव येथे १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संतापजनक घटनेने संपूर्ण राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या घटनेमुळे समाजमन हादरले असून सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी सावरगाव येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी आपण पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.

सदर प्रकरण (Minor Girl Abuse) फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार धोत्रे यांनी सांगितले. तसेच पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी माजी आमदार बळीराम शिरस्कार, रमण जैन, तालुका अध्यक्ष कपिल खरप, भिकाजी धोत्रे, प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे, राजू उगले सचिन ढोणे, छोटु देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related to this topic: