Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

चंद्रशेखरजी बावनकुळे

सत्रापुर मुख्य मार्ग ते नदी पात्रापर्यंत जागा विकास कामाकरिता अधिग्रहण करावी

Chandrasekharji Bawankule: सत्रापुर प्रभाग क्र.१० येथील जागेचे विकास कामांसाठी अधिग्रहणाची मागणी नगरसेवक शक्ती पात्रे यानी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे याना केली.


सत्रापुर मुख्य मार्ग ते नदी पात्रापर्यंत जागा विकास कामाकरिता अधिग्रहण करावी

Chandrasekharji Bawankule |

ना. चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री तथा पालकमंत्री याना निवेदनाने मागणी

कन्हान (Chandrasekharji Bawankule) : नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत सत्रापुर प्रभाग क्र.१० येथिल मुख्य मार्गापासुन ते नदीच्या पात्रा पर्यंत खाली असलेली जागा मौजा पिपरी सर्वे क्र. २७३ ही मालकी हक्काची जागा विविध योजनेत विविध विकास कामाकरिता अधिग्रहण करून अत्या वश्यक विविध विकास कामे निर्माण करण्यात यावी. अशी मागणी महसुल व पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे हयाना प्रभाग क्र.१० चे भाजप नगरसेवक शक्ती पात्रे यानी निवेदन देऊन केली आहे. 

सत्रापुर हे गाव ग्राम पंचायत अस्तित्वात येण्या च्या आधीपासुन बसलेले असुन आजही या भागात मूलभुत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. गावाच्या चारही बाजुनी खाजगी कंपनी खंडेलवाल व रीटा स्टील कंपनी ची जमीन असल्यामुळे या वस्तीस स्वतंत्रपणे विकासाची संधी मिळालेली नाही. सत्रापुर प्रभाग क्र.१० हा प्रामुख्याने मागासवर्गीय (दलित) समाजाची वस्ती असुन येथील नागरिक शिक्षण, आरो ग्य व इतर मूलभुत सुविधांपासुन वंचित आहेत. या परिस्थितीमुळे सामाजिक व आर्थिक प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. म्हणुन सत्रापुर प्रभाग क्र.१० येथील मुख्य मार्गापासुन नदी पात्रापर्यंत अस लेली मौजा पिपरी सर्वे क्र.२७३ ही अंदाजे ४.३८ हेक्ट र (सुमारे १० एकरावर) जमीन जी दिनेश पीतांबर जयस्वाल व इतर यांच्या मालकीची असुन कित्येक वर्षापासुन पडीत आहे.

ती सार्वजनिक हिताच्या दृष्टीने विविध विकास कामांसाठी अधिग्रहित करून या जागे वर १) सीवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) उभारण्यास मंजुर करणे, २) सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमां साठी मोठे समाज भवन तयार करणे. ३) अंगणवाडी सह इयता १ ते ४ पर्यंत शाळा बनविण्यात यावी. ४) पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी मंजुर करणे. ५)  ई-लायब्ररी व कंपाउंड वॉल मंजुर करणे. ६) क्रीडांगण व  व्यायामशाळा मंजुर करणे. ७) सार्वजनिक उद्यान (गार्डन) मंजुर करणे. ८) सार्वजनिक शौचालाय मंजुर करणे. ९) ग्रीन जिम सुविधा मंजुर करणे आदी अत्या वश्यक विविध विकास कामे निर्माण करण्यात यावी. अशी मागणी महसुल व पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे हयाना प्रभाग क्र.१० चे भाजप नगरसेवक शक्ती पात्रे यानी केली आहे.

Related to this topic: