Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा

Santosh Bangar

आ. संतोष बांगर यांच्या पुढाकाराने 8 वर्षीय चेतनची मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहू शकणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाला आमदार संतोष बांगर आणि आरोग्य दूत तथा रुग्णसेवक रविभाऊ राठोड यांच्या तातडीच्या मदतीमुळे नवजीवन मिळाले आहे.


आ संतोष बांगर यांच्या पुढाकाराने 8 वर्षीय चेतनची मुंबईत मोफत हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

Santosh Bangar |

दुधाळा तांडा येथील मुलाला मिळाले नवजीवन; आरोग्य दूत रविभाऊ राठोड यांच्या समन्वयातून वाडिया रुग्णालयात उपचार

हिंगोली : आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून वंचित राहू शकणाऱ्या एका 8 वर्षीय मुलाला आमदार संतोष बांगर आणि आरोग्य दूत तथा रुग्णसेवक रविभाऊ राठोड यांच्या तातडीच्या मदतीमुळे नवजीवन मिळाले आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा तांडा येथील रहिवासी नवनाथ जाधव यांचा 8 वर्षीय मुलगा चेतन नवनाथ जाधव याला चालताना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. कुटुंबीयांनी उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे पुढील उपचार करणे शक्य होत नव्हते.

या परिस्थितीत नवनाथ जाधव यांनी आमदार संतोष बांगर यांची भेट घेतली. मुलाची अवस्था पाहून आमदार संतोष बांगर यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत काही आर्थिक मदत तात्काळ दिली. तसेच आरोग्य दूत तथा रुग्णसेवक रविभाऊ राठोड यांचा संपर्क क्रमांकही दिला.

रविभाऊ राठोड यांनी वेळ न दवडता नवनाथ जाधव यांना थेट मुंबईतील वाडिया रुग्णालयात बोलावून घेतले. तेथे चेतनला तातडीने दाखल करून त्याच्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर चेतन 8 ते 10 दिवस व्हेंटिलेटरवर होता. त्याला शुद्धीवर यायला वेळ लागत असल्याने पालक नवनाथ जाधव आणि त्यांच्या पत्नीला मोठी चिंता वाटत होती. मात्र या कठीण काळात रविभाऊ राठोड यांनी त्यांना सातत्याने धीर दिला आणि मानसिक आधार दिला.

सध्या चेतन पूर्णपणे सुखरूप असून त्याला वाडिया रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तो आता आपल्या घरी परतत आहे.

"आमदार संतोष बांगर यांनी देवदूतासारखी मदत केली नसती तर आमच्या चेतनला वाचवू शकलो नसतो. त्यांनी फक्त आर्थिक मदतच नाही, तर माणुसकीचा आधार दिला," असे नवनाथ जाधव यांनी सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या संवेदनशीलतेमुळे एका गरीब कुटुंबाला नवजीवन मिळाल्याचे हे उदाहरण ठरले आहे.

Related to this topic: