Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सामूहिक विवाह सोहळा

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Mass wedding ceremony: नुरी हेल्प क्लब दरवर्षी जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करते. यावर्षी २६ अगस्त रोजी कळमनुरी येथे आयोजन.


जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Mass wedding ceremony |

सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने  नोंदणी करण्याचे नुरी हेल्प क्लब च्या वतीने आवाहन
जश्ने ईद मिलादुन्नबी 2026 या कार्यक्रम नवरदेवचे हस्ते केले उद्घाटन

कळमनुरी (Mass wedding ceremony) : येथील नुरी हेल्प क्लब वतीने मागील नऊ वर्षा पासून , जश्ने ईद मिलादुन्नबी चे औचित्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सामूहिक विवाह सोहळ्यात नागरिकांना मोठ्या संख्येने विवाह साठी नोंदणी करण्याचे आवाहन नुरी हेल्प क्लब च्या वतीने करण्यात आले आहे. नुरी हेल्प क्लब च्या वतीने दरवर्षी जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

या  (Mass wedding ceremony) कमिटीच्या वतीने विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य देऊन वर वधू मंडळी च्या प्रत्येकी १०० लोकांची जेवणाची व्यवस्था ही या विवाह सोहळ्यात सोहळ्यात येते यामुळे अनेकांना विवाह साठी लागणारे खर्चाची बचत होत आहे. या उद्देशाने नुरी हेल्प क्लब च्या वतीने गेल्या नऊ वर्षापासून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यावर्षी हि २६ अगस्त रोजी रजा़ ए नुरी फंक्शन हाल कळमनुरी येते. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या चांगल्या कामाला नागरिकांना पुढे येऊन जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुला मुलीचे लग्न करण्यासाठी ५ आगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

Related to this topic: