Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

साई मंदिर वर्धापन दिन

50 वर्षांची अविरत सेवा आणि मंदिर स्थापन, 31 व्या वर्षात पदार्पण

Sai Temple Anniversary: शिवाजीनगरातील साई मंदिराने वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद व रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विमल ताई कोतावार यांनी ५० वर्षांची सेवा प्रदान केली.


50 वर्षांची अविरत सेवा आणि मंदिर स्थापन 31 व्या वर्षात पदार्पण

Sai Temple Anniversary |

शिवाजीनगर येथील साई मंदिर वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद व रक्तदान शिबिराचे आयोजन

हिंगोली (Sai Temple Anniversary) : शहरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर येथील साई मंदिर देवस्थानचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिरात महाप्रसाद भंडारा आणि सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्रद्धा आणि सेवेचा ५० वर्षांचा वारसा
हे (Sai Temple) मंदिर श्रीमती विमल ताई कोतावार यांच्या सेवेतून आणि स्वखर्चातून उभारले गेले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षीही विमल ताईंची बाबांच्या चरणी असलेली श्रद्धा तसूभरही कमी झालेली नाही. गेल्या ५० वर्षांपासून त्या अविरतपणे साईबाबांची सेवा करत आहेत. मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे हे ३१ वे वर्ष असून, या निमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम
केवळ धार्मिक विधींवर मर्यादित न राहता, मंदिर प्रशासनाने सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सध्या सर्वत्र ब्लड बँकांमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ही निकड ओळखून कोतावार परिवाराच्या वतीने घेण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुढे या..
यावेळी बोलताना मंदिर विश्वस्त आणि ब्लड बँकेच्या अधिकाऱ्यांनी विमल ताईंच्या या उपक्रमाचे कौतुक केले. "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या रक्ताची गरज पाहता, इतर संस्था आणि नागरिकांनीही अशाच प्रकारचे आदर्श समोर ठेवून रक्तदान कॅम्प आयोजित करावेत," असे आवाहन यावेळी करण्यात आले. या  (Sai Temple Anniversary) वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाप्रसादाचा लाभ शिवाजीनगर परिसरातील व शहरातील हजारो भाविकांनी घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोतावार कुटुंबिय आणि साई भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.

Related to this topic: