Prataprav Jadhav: ना. प्रतापराव जाधव यांनी चांडोळ येथे दिव्यज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी तरुणांना व महिलांना उद्योजक बनवण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचे आवाहन केले.
बुलढाणा (Prataprav Jadhav) : तालुक्यातील चांडोळ येथे दिव्यज्योती महिला अर्बन पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ना. प्रतापराव जाधव यांनी मार्गदर्शन करताना सहकारातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी सहकारी पतसंस्थानी समाजातील होतकरू तरुणांना व महीलांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करुन उद्योजक निर्माण करुन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना.श्री. प्रतापराव जाधव यांनी चांडोळ येथे दिव्यज्योती महीला सहकारी पतसंस्थेच्या चांडोळ येथील शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.चांडोळ येथे दिव्य ज्योती महिला सहकारी पतसंस्थेच्या शाखा विस्ताराच्या उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते अंकुशराव पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिव्यज्योती महिला अर्बनच्या कार्यकारी संचालिका वर्षाताई माधव तायडे यांनी संस्थेचा आजवरच्या वाटचालीचा आढावा देत भविष्यात महिलांना उद्योगासाठी संस्था अर्थसहाय्य देण्यासाठी बांधील असून सर्वसामान्यांसाठी संस्था कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रमिलाताई भरत वाघुर्डे उपाध्यक्ष सिमा अनिल कुटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले शाखा उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे देविदास पाटील, अनिल जाधव, गजानन देशमुख, राजू चांदा, विष्णू वाघ, विष्णू उगले, पुरषोत्तम भोंडे, योगेश राजपूत, दीपक टाकसाळ, चक्रधर उबाळे, सोनू तायडे, सुरेश भिवसनकर, त्याचबरोबर शिवसेना (ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, धाडचे सरपंच सावित्रीबाई बोर्डे, नंदूभाऊ सवडतकर, रामकृष्ण तायडे, शिवाजी देशमुख, दिगंबर जाधव, यशवंत सोनुने , सागर जयस्वाल, साखरे महाराज, सुरेश धनावत, दिपक धनावत, राहुल सोलंके सचिन ताटू, विजय जाधव, विनोद खडके, मराठा अर्बनचे अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले, नाना माळोदे, निलेश गोरे, दिनेश काळे, हरिदास गोरे, गणेश सोनुने, रामराव जाधव, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश गुजर, मयूर पडोळ, संदीप पालकर, अमोल शिंदे, विलास गुजर, टीका खान,शालिग्राम वाघ, सईद खासाब,माणिकराव खांडवे, योगेश ताठे, अभिषेक भराड, डॉ. राजेंद्र तायडे, डॉ. प्रवीण तायडे, प्रवीण वाघ, संतोष आघाव, शकील सौदागर, अनिस जमदार, मोतीराम बिबे, देविदास जाधव, विशाल शेळके, आत्माराम नरवाडे, सिद्धू लडके, भास्कर मघाडे, बबन फेपाळे, सिद्धार्थ जाधव, शरद माळोदे, प्रमोद खोंडे,अविनाश क्षीरसागर, राजू गायकवाड, छोटू मेहेर, कैलास रोकडे, विशाल गावंडे, सुनिल महाजन,शरद पालकर, सुनील वाघ, अंकुश डुकरे, रामदास कानडजे, सागर जट्टे, शेषराव ठाकरे, दिलीपमामा जट्टे, दिलीप ब्राह्मणे, सचिन जोशी, यांच्यासह असंख्यनागरिक व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव तायडे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बबलू वाघुडे, शरद शेरे, नागेश मोहिते, ईश्वर कोप्पे, सतीश धनावत, अक्षय सोनुने, दीपक शेळके, उदय जाधव, व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.