Dr. Santosh Korpe: डॉ. संतोष कोरपे यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध होण्याचे महत्व अधोरेखित केले, यातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
Dr. Santosh Korpe |
मानोरा (Dr. Santosh Korpe) : सहकार क्षेत्राची निवडणूक जोपर्यंत बिनविरोध होणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. इतर अनेक निवडणुका आहेत त्यात राजकारण करून त्या बिनविरोध झाल्या नाही तरी चालेल, मात्र सहकार क्षेत्रातील निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे (Dr. Santosh Korpe) यांनी केले.
मानोरा येथील ठाकरे पॅलेस येथे दिनांक २० मार्च रोजी बँक निवडणूक निमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन ही (Dr. Santosh Korpe) त्यांनी केले. व्यासपीठावर ललित बहाळे, शिरीष धोत्रे, डॉ. जयराज कोरपे, देविदास गावंडे, बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, बँकेचे माजी संचालक सुरेश गावंडे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक अरविंद पाटील इंगोले, सौ.धोत्रे, ठाकरे आदी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा. हेमंत देशमुख यांनी केले. सभेला बहुसंख्य मतदार उपस्थित होते.