Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

महिलेचा अपघाती मृत्यू

साडीचा पदर चाकात अडकला; महिलेचा जागीच मृत्यू

Woman Accidental Death: मानोरा तालुक्यात साडीचा पदर मोटारसायकलच्या चाकात अडकून महिलेचा अपघातात मृत्यू. उषाबाई गिरी यांचे निधन झाले.


साडीचा पदर चाकात अडकला महिलेचा जागीच मृत्यू

Woman Accidental Death |

 

मानोरा तालुक्यातील कुपटा जवळील अपघाताची घटना

मानोरा (Woman Accidental Death) : मोटारसायकलच्या मागील चाकात साडीचा पदर अडकून झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि. ४ मे रोजी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मानोरा तालुक्यातील कुपटा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  

प्राप्त माहितीनुसार, आसोला खुर्द येथील उषाबाई पुरुषोत्तम गिरी या दुचाकीवरून लग्नानिमित्त बाहेरगावी जात असताना  कुपटा गावाजवळ पोहोचताच त्यांच्या साडीचा पदर अचानक मोटारसायकलच्या मागील टायरमध्ये अडकला. त्यामुळे संतुलन बिघडून त्या रस्त्यावर खाली पडल्या. या (Woman Accidental Death) अपघातात उषाबाई गिरी यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. जखमा अतिशय गंभीर असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.  त्यांच्या अकाली निधनामुळे आसोला खुर्द गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे. या (Woman Accidental Death) घटनेमुळे दुचाकीवर प्रवास करताना साडी किंवा ओढणी यांसारख्या वस्त्रांबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

Related to this topic: