आमदार सदाभाऊ खोत

आ.सदाभाऊ खोत यांच्याकडून भोसीच्या माळराणावरील 'नंदनवनाचे' कौतुक

MLA Sadabhau Khot: नांदेडमध्ये विधी मंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यात आ. सदाभाऊ खोत यांनी भोसीच्या माळराणावर फळबागांची पाहणी केली आणि शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांची प्रगतीचे कौतुक केले.

आ.सदाभाऊ खोत यांच्याकडून भोसीच्या माळराणावरील 'नंदनवनाचे' कौतुक

MLA Sadabhau Khot

शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांच्या फळबागेला दिली भेट

नांदेड (MLA Sadabhau Khot) : विधी मंडळ अंदाज समिती सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान गुरुवारी समितीचे सदस्य आणि माजी आ. सदाभाऊ खोत  (MLA Sadabhau Khot) यांनी भोकर मतदारसंघातील भोसी येथील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या फळबागेला अचानक भेट दिली. माळराणासारख्या खडकाळ जमिनीत फुलवलेली ही फळबाग पाहून त्यांनी शेतकऱ्याचे विशेष कौतुक केले.

​भोसी येथील प्रगतशील शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या माळराणावरील शेतात विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी या बागेला भेट देऊन पाहणी केली. केवळ पारंपरिक पिके न घेता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गायकवाड यांनी माळराणावर जे प्रयोग केले आहेत, ते पाहून खोत थक्क झाले.

​या भेटीदरम्यान सदाभाऊ खोत (MLA Sadabhau Khot) यांनी बागेतील विविध फळझाडांची सविस्तर माहिती घेतली. गायकवाड यांच्या बागेत जपानचा प्रसिद्ध 'मियाझाकी' आंबा, थायलंडचा 'रेड आयवरी', बनाना आंबा, तसेच पांढरा जांभूळ आणि सफरचंद यांसारख्या दुर्मिळ व विदेशी फळझाडांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. अत्यंत कष्टाने माळराणावर हे नंदनवन फुलवल्याबद्दल खोत यांनी गायकवाड कुटुंबीयांचे अभिनंदन केले.​याप्रसंगी नंदकिशोर गायकवाड, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी मंडळ अंदाज समितीच्या या भेटीमुळे आणि सदाभाऊ खोत यांनी केलेल्या कौतुकामुळे भोसी येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संबंधित सामग्री

नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्बची अफवा; मेलवर माहिती आल्याने एकच खळबळ

नांदेडच्या जिल्हा सत्र न्यायालयात बॉम्बची अफवा; मेलवर माहिती आल्याने एकच खळबळ

NANDED DISTRICT SESSIONS COURT: नांदेडच्या जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात 2 नोव्हेंबर एकच खळबळ उडाली. त्याचे  मुख्य कारण होते मेलद्वारे आलेल्या संदेशानुसार बॉम्बने न्यायालय उडून देण्याची धमकी.

Nov 02, 2026
आरक्षित रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थ व प्रवास विम्याबाबत रेल्वेचे आवाहन

आरक्षित रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना; बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थ व प्रवास विम्याबाबत रेल्वेचे आवाहन

Nanded Division Reserved Railway: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे आरक्षित रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बोर्डिंग स्टेशन, रिक्त बर्थचे वाटप आणि प्रवास विमा सुविधेबाबत महत्त्व

Oct 27, 2026
कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला कार्यालयात नेले, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; फायनान्स कंपनीवर गंभीर आरोप

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्याला कार्यालयात नेले, दुसऱ्या दिवशी मृतदेह आढळला; फायनान्स कंपनीवर गंभीर आरोप

नांदेडमध्ये १० हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू. फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर नातेवाइकांचे आरोप; पोलिसांकडून तपास सुरू.

Oct 24, 2026
शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१ लाख द्या, सरकारने फक्त ५ हजार रुपये देऊन बोळवण केली; रोहित पवारांचा घणाघात

शेतकऱ्यांना हेक्टरी ₹१ लाख द्या, सरकारने फक्त ५ हजार रुपये देऊन बोळवण केली; रोहित पवारांचा घणाघात

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या, अशी रोहित पवारांची मागणी. क्षीरसागर यांच्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली.

Oct 22, 2026
नांदेडमध्ये कर्ज आणि पीक नुकसानीच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा प्रश्नही ऐरणीवर

नांदेडमध्ये कर्ज आणि पीक नुकसानीच्या विवंचनेत शेतकऱ्याची आत्महत्या; मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीचा प्रश्नही ऐरणीवर

नांदेडच्या बोरगावमध्ये ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. पीक नुकसान, कर्जमाफी आणि मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाच्या फीबाबत त्यांनी व्हिडिओतून व्यथा मांडली.

Oct 19, 2026