Breaking News
  • सांगलीत पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
  • तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले असले तरी सह्याद्रीच्या कुशीत मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
  • अनिकेत तटकरे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर गोगावले यांच्या भेटीला
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

सिंदखेडराजा पंचायत समिती

प्रशासनाचा 'स्मार्ट' पॅटर्न! सिंदखेडराजा पंचायत समितीकडून थेट हेल्पलाईन सुरू

Sindkhedaraja Panchayat Samiti: सिंदखेडराजा पंचायत समितीने ग्रामीण नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि प्रलंबित कामांचे २४ तासांत निपटण्यासाठी '७०२८४७८१७९' हेल्पलाईन


प्रशासनाचा स्मार्ट पॅटर्न सिंदखेडराजा पंचायत समितीकडून थेट हेल्पलाईन सुरू

Sindkhedaraja Panchayat Samiti |

 

घरबसल्या फक्त एका SMS द्वारे मिळणार योजनांची माहिती आणि प्रलंबित कामांचा २४ तासांत निपटारा...!

गट विकास अधिकारी अजितकुमार बांगर यांचा अभिनव उपक्रम

सिंदखेडराजा (Sindkhedaraja Panchayat Samiti) : तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी आणि आपल्या प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी आता पंचायत समिती कार्यालयात प्रत्यक्ष चकरा मारण्याची गरज उरणार नाही. पंचायत समिती सिंदखेडराजा गट विकास अधिकारी  अजितकुमार बांगर यांच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गतिमान पाऊल उचलण्यात आले असून,    '७०२८४७८१७९'हा विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैशांची मोठी बचत होणार आहे.
    
ग्रामीण भागातील (Sindkhedaraja Panchayat Samiti) सर्वसामान्य नागरिकांना घरकुल योजना, नरेगा (रोजगार हमी योजना), हप्ता वितरण, मस्टर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची माहिती सहज मिळावी, हा या हेल्पलाईनचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय, पंचायत समितीमधील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे प्रलंबित असलेले दाखले, योजनांचे फोटो अपलोड करणे, प्रस्ताव मंजुरी इत्यादी कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी नागरिक या हेल्पलाईनचा वापर करू शकणार आहेत. तसेच, गट विकास अधिकारी श्री. अजितकुमार बांगर यांच्या संकल्पनेतून (Sindkhedaraja Panchayat Samiti) पंचायत समितीच्या हेल्पलाईन चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी स्वप्निल निकम, सह गटविकास अधिकारी भास्कर घुगे, कक्ष अधिकारी सुनील नागरे, विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, सरपंच प्रतिनिधी म्हणून भगवान पालवे, रवी आघाव, मधुकर इनकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष कैलास झिने,गणेश मेहेत्रे तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

मदतीसाठी नागरिकांनी काय करावे? (फक्त SMS करावा)

नागरिकांनी पंचायत समितीकडे (Sindkhedaraja Panchayat Samiti) प्रत्यक्ष न जाता, आपल्या मोबाईलवरून पुढील माहिती लिहून ७०२८४७८१७९या क्रमांकावर एसएमएस (SMS) संदेश पाठवावा: स्वतःचे पूर्ण नाव लिहावे. आपल्या गावाचे व ग्रामपंचायतीचे नाव नमूद करावे. आपली समस्या किंवा ज्या कामाची माहिती हवी आहे, ती स्पष्टपणे लिहावी.

२४ तासांत समस्या निवारणाचा दावा:

या (Sindkhedaraja Panchayat Samiti) हेल्पलाईनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, संदेश प्राप्त झाल्यानंतर केवळ २४ तासांच्या आत नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण होऊन प्रशासनात कमालीची पारदर्शकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा संजीवनी ठरणारी असून यामुळे इंधन आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत.

Related to this topic: