Risod Bazar Samiti: रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिया पिकातून आर्थिक आधार मिळवला आहे. बाजार समितीने ५०% सवलतीत बियाणे देऊन उत्पादनाला प्रोत्साहन दिले आहे.
बाजार समितीचा मदतीचा हात; ५०% सवलतीत बियाणे
रिसोड (Risod Bazar Samiti) : वाढता उत्पादन खर्च आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक शेती अडचणीत असताना, रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी 'चिया' या पर्यायी पिकातून नवा मार्ग शोधला आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारामुळे चिया पिकाला या हंगामात विक्रमी दर मिळाला असून, शेतकऱ्यांसाठी हे पीक आता खऱ्या अर्थाने आर्थिक आधार ठरत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना चिया बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून रिसोड कृ. उ. बाजार समिती कडून शेतकऱ्यांना पन्नास टक्के सवलतीच्या दारात बियाणे वाटप करण्यात आले होते.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चियाची पेरणी केली होती. बाजार समितीच्या माध्यमातून मिळालेला 'विक्रमी दर' हा परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल. शेतकऱ्यांना चिया विक्री साठी बाजार बाजार समितीने पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील चिया उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. पारंपरिक पिकांच्या भावातील चढ-उताराला हा एक उत्तम पर्याय ठरत आहे काल बाजार समितीत तीनसे क्विंटल च्या वर आवक आली होती आणि चियाला सिझन मधील उचांकी दर अठरा हजार चारसे रुपये मिळाला आहे बाजार समितीच्या पुढाकाराने रिसोडच्या शेतकऱ्यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय आणि बाजार समितीचे सहकार्य हे विदर्भातील कृषी क्षेत्रासाठी एक उत्तम मॉडेल ठरू शकते! बाजार समितीने केवळ सवलतीत बियाणे दिले नाही, तर उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले. आज जेव्हा शेतकरी आपला माल बाजार समितीत घेऊन येत आहेत, तेव्हा त्यांना अपेक्षित दरापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.
रिसोड कृ. उ. बाजार समिती (Risod Bazar Samiti) कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चिया पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रयत्न शील आहे. चिया या नवीन्य पूर्ण आणि पर्यायी पिका साठी कृ. उ. बा. समिती सतत प्रयत्न करणार आहे.
- विष्णुपंत भुतेकर सभापती कृ. उ. बा. समिती रिसोड
पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून आम्ही चियाची निवड केली. बाजार समितीने सवलतीत बियाणे दिल्यामुळे सुरुवातीचा खर्च कमी झाला आणि आता मिळणारा दर पाहता, हे पीक रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नशीब बदलणारे ठरेल, यात शंका नाही."
-अंबादास खरात प्रगतशील शेतकरी, पळसखेडा