Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड युवक मृत्यू

रिसोडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

Risod Youth Death: रिसोड येथे 10 मे रोजी एक युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. डिगांबर कापुरे नावाच्या 35 वर्षीय युवकाचा वाशीम येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला


रिसोडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

Risod Youth Death |

रिसोड (Risod Youth Death) : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक ठार झाल्याची घटना दिनांक 10 मे रोजी रात्री 7:45 वाजता च्या दरम्यान रिसोड वाशिम मार्गावर चिखली नजीक असलेल्या परिवार धाब्याजवळ घडली. डिगांबर गोपीनाथ कापुरे वय 35 वर्ष राहणार सवड तालुका रिसोड असे (Risod Youth Death) मृतकाचे नाव असून सदर घटनेनंतर सवड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, डिगांबर कापुरे हे आपल्या काही कामानिमित्ताने वाशिम च्या दिशेने जात असताना परिवार धाब्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यावेळी ते रस्त्याने पायी चालत असल्याची माहिती मिळाली असून घटनेची माहिती (Risod Youth Death) मिळताच आसपास जवळील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत 108 वर कॉल करून ॲम्बुलन्स बोलावली व जखमी अवस्थेत डिगांबर कापुरे यांना वाशीम येथे रवाना करण्यात आले. मात्र वाशिम येथील रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार रिसोड पोलीस स्टेशनला दाखल झाली नाही.

Related to this topic: