Resode Census 2027: शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्व-जनगणना' मोहिमेत रिसोड तालुक्यातील पाचंबा गावाने उल्लेखनीय यश मिळविले
तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या पुढाकाराला यश; रिसोड तालुक्यातील पहिले गाव ठरले मानकरी
रिसोड (Resode Census 2027) : शासनाच्या धोरणात्मक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'स्व-जनगणना' मोहिमेत रिसोड तालुक्यातील पाचंबा गावाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या अचूक नियोजनामुळे आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या गावाची शंभर टक्के स्व-जनगणना पूर्ण झाली असून, तालुक्यात या मॉडेलचे कौतुक होत आहे.
तहसील प्रशासनाने निवडलेल्या गावांमध्ये पाचंबा गावाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट प्रतिसाद दिला. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी स्वतः या मोहिमेत पुढाकार घेऊन विविध स्तरांवर बैठका घेतल्या आणि नागरिकांना या (Resode Census 2027) प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्यात योग्य समन्वय घडून आला.
या (Resode Census 2027) मोहिमेच्या यशात सरपंच शोभा जाधव, सरपंच प्रतिनिधी विष्णू जाधव, तलाठी विजया राऊत आणि मंडळ अधिकारी समाधान जावळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच अंगणवाडी सेविका लता ताकतोडे व गीता ताकतोडे यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. यासह साईनाथ शिंदे, संतोष बिल्लारी, दिलीप पवार, अतुल डवरे, महेश जिरवणकर, किरण मोरे आणि शिवाजी कव्हर या टीमच्या परिश्रमामुळे अल्पावधीतच १०० टक्के नोंदणी पूर्ण होऊ शकली.